*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न* 

*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न* 

 करकंब /प्रतिनिधी

करकंब येथील रोजी रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे इयत्ता आठवीसाठी   पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन शासनामार्फत करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण 231 विद्यार्थी(भोसे,करकंब,खेडभोसे,पटवर्धन कुरोली,सांगवी,उंबरे,पेहे)अश्या परिसरातील विविध गावातील माध्यमिक प्रशालेचे विद्यार्थ्यी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व परीक्षार्थींची थर्मल स्कॅनिंग, ऑक्सी मिटर ,तपासून व  सॅनिटायझर,करून स्वच्छंदी अशा वातावरणात परीक्षा घेण्यात आले
    या परीक्षेच्या प्रसंगी पंढरपूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अधिकारी माननीय श्री.महारूद्र नाळे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन प्रशालेची पाहणी करून प्रशालेनी केलेल्या  नियोजनाबाबत कौतुक करून परीक्षार्थींना शुभेच्छा दिले. सदर परीक्षेचे नियोजन माननीय मुख्याध्यापक हेमंत कदम सर,केंद्रसंचालक करकंब बीटचे केंद्रप्रमुख श्री.अप्पासाहेब माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
   या परीक्षा यशस्वी करण्यासाठी  पांडुरंग देशमुख,संजय सांगोलकर,गजानन मेटकर,रमेश म्हेत्रे,अशोक खपाले,मोहनसिंग रजपूत,सौ.सपना नाकिल,सौ.लक्ष्मी शिंदे,रोहिदास माने,सोमनाथ माने,नामदेव सलगर,फैय्याज इनामदार,महादेव माळी,नागन्नाथ घाटुळे, प्रशालेतील कर्मचारी अर्जुन भंडारे,सुभाष चौगुले,रोहीत गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
    विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य सेविका व पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते